– आलापल्ली- आष्टी मार्गावर अपघात
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 27 सप्टेंबर : जिल्हयातील सुरजागड येथून लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी लोहखनिज वाहतुक करणाऱ्या 8 ते 10 ट्रकला आगीच्या भक्शस्थानी टाकल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी घडली. शातीग्राम जवळ भीषण अपघात . बिजोली शुभास जयदार रा कांचनपुर जि. गडचिरोली मुत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे सदर घटनेने पुून्हा एकचा सुरजागड प्रकल्पाचा वाद चिघळल्याचे दिसुन येत आहे.
प्राप्त माहितीनुसा, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू असून दररोज ट्रकव्दारे मोठया प्रमाणात लोहखनिज वाहतुक केली जाते. स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाकरिता विरोध असतांनाही हे प्रकल्प सुरू करण्यात आले असून अनेकदा अपघात घडले आहे. आज 27 सप्टेंबर रोजी लगाम नजीक दुचाकी स्वारास लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक ने धडक दिली असता दुचाकीवर असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करीत सुरजागड प्रकल्पात लोहखनिज वाहतुकीस असलेल्या 7 ते 10 ट्रकची जाळपोळ केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सुरजागड प्रकल्पाचा वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली: सुरजागडच्या मालवाहु ट्रकच्या अपघातात महिला ठार, संतप्त नागरिकांनी ट्रक पेटविले
– आलापल्ली- आष्टी मार्गावर अपघात #Surjagarh #Gadchiroil pic.twitter.com/0n3VP5qM2W— Lokvrutt News (@lokvruttnews) September 27, 2022