लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 3 डिसेंबर:- गडचिरोली मुख्यालयापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर जेप्रा परिसरात वारंवार सतत तीन दिवस धान्याचे पुजणे पेटविण्याचा सत्र सुरूच
काल दिनांक 2 डिसेंबर 2022 रोज शुकरवरला सायंकाळी 7 ते 8 वा दरम्या बाबुराव सदुजी चूधरी यांच्या मालकीच्या 2.5 एकर शेतीचे पूजणे अज्ञत इसमाने जाळले त्यामुळे सदर शेतकरी यांचे 80 ते 90 हजार रुपयाचे नुकसान झाले
यापूर्वी श्रीमती सुशीला लक्ष्मण गुंफळवार या शेतकरी महिलेचे पुजनें जाळले होते 3.5 एकरचे ही घटना ताजी असतानाच अचानक पुन्हा ही घटना घडल्या मुळे परिसरात शेतकरी चिंतातुर झाली आहे.
रात्रोच्या सुमारास धानाच्या पुंजण्यास आग लागली यात संपूर्ण धान राख झाले. सदर घटनेने मात्र धान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अज्ञात इसमाने धान पुंजण्यास आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या वतीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतूरे यांनी केली आहे. तर धानाचे पुंजने जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे.