लोकवृत्त न्यूज
जि/प्र.गडचिरोली 4 जानेवारी : आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोज मंगळवार ला दिभना (माल) येथे सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक नेताजी गावतुरे तालुका अध्यक्ष जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली, उद्घाटक माननीय मारोतराव इचोडकर साहेब माझी सभापती पंचायत समिती गडचिरोली, सह उद्घाटक माननीय विलास दशमुखे माजी सदस्य पंचायत समिती गडचिरोली, माननीय अरविंद भाऊ कात्रटवार, सह संपर्कप्रमुख शिवसेना गडचिरोली, प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राचार्य प्रशांत वाघरे माजी सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली, माननीय डॉक्टर शिवनाथ कुंभारे साहेब गडचिरोली.
यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला मालाअर्पण व दीप प्रज्वलन करण्यात. त्यानंतर गावातील महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. लगेचच मान्यवरांचे सत्कार करून मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये माननीय डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांनी ग्रामगीता वाटप केले. माननीय मारोतराव जी इचोटकर यांनी आपल्या गीतातून सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र सांगितले, माननीय प्रशांत वाघरे यांनी स्त्रीने स्वतःला सुरक्षित ठेवावे कसे हे सांगितले, माननीय अरविंद भाऊ कात्रटवार, माननीय विलास देशमुख अध्यक्ष माननीय नेताजी गावतुरे यांनी सुद्धा सावित्रीबाई यांचे जीवनावर मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन डिमराज गुरनुले यांनी केले त्यानंतर गावभर शोभायात्रा फिरवण्यात आली. आणि रात्रोला विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले