चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या व्याहाळ खुर्द चा भोगळ कारभार

0
276

– लिपिकाची ग्राहकासोबत मनमानी

लोकवृत्त न्यूज 
चंद्रपूर, १ मार्च:- जिल्ह्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून येथील लिपिक ग्रागकांसोबत मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे.

येथील बँकमध्ये परिसरातील अनेकांचे खाते आहेत. खातेधारकाना योग्य सेवा देणे हे बँकेचे प्रथम कर्तव्य आहे मात्र सदर बँकेत असलेला लिपिक हा मनमानी कारभार करत असल्याचे खातेधारकांचे म्हणणे असून खात्यात जमा असलेल्या रकमेची पासबुकवर प्रिंट करण्यासाठी खातेधारकाने मागणी केली असता सदर लिपिक सॉफ्टवेअर नवीन असल्याचे सांगून पासबुक प्रिंट करून देण्याया टाळाटाळ करत असल्याचेही खातेधारक सांगतात. यावरून प्रिंट सॉफ्टवेअर जर लिपीकास नवीन वाटत असेल आणि त्यामुळे पासबुक प्रिंट करून मिळत नसेल तर याचा त्रास खातेधारकांनी का भोगावा असा सवालही करण्यात येत आहे. आधीच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून दूरवरून खातेधारक आपले व्यवहार करण्याकरिता बँक मध्ये येतात मात्र अशा कारभारामुळे त्यांना अधिक वेळ ताटकळत राहावे लागत आहे तर कधी अशा परिस्थतीत खाली हात परतावे लागत आहे. बँक सदर गंभीर बाबी कडे दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चा ग्राहक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here