लोकवृत्त न्यूज
आफताब शेख- शेवगाव तालुका प्रतिनिधी १ मे: शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेले बोधेगाव येथील आबासाहेब काकडे फार्मसी कॅम्पस येथे 63 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डी फार्मसी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य राजेश मोकाटे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आल्याने राष्ट्रगीत व ध्वजगीता सोबतच राज्यगीतही म्हणण्यात आले. यावेळी बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रद्युम्न ईगे, उपप्राचार्य भरत जाधव, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश मोकाटे, पत्रकार आफताब शेख,प्राध्यापक आसिफ शेख, सोमनाथ वडघने, देविदास खराद, हेमंत पातकळ, अमोल उगले, अमोल चव्हाण,अतुल राऊत, सतीश गोरे,राजु नेमाने, सोमनाथ डावखर, संदीप बडढे,अमोल सुपेकर,जमीर शेख, संदीप खंडागळे,विक्रम सारूक,संदीप सौधर,विठ्ठल तिकोने,निकेत फलके,कांचन वनवे,प्राजक्ता भस्मे,प्रिती घुमरे यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.