आरमोरी येथे आरोग्य सेवा संदर्भात अडचणींविषयी मांडणी

0
155

लोकवृत्त न्यूज ( Lokvrutt news)
आरमोरी, ८ जून :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्टापी संस्था पुणे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडाअंतर्गत सुरू असलेल्या आरोग्यासाठी सामाजिक कृती प्रकल्पाअंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गावपातळीवर असलेल्या आरोग्य सेवा संदर्भात अडचणीविषयी मांडणी करण्यात आली. तसेच आरोग्य सेवेअंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नावर चर्चा घडवून आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल सावळे, आरमोरी महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डोर्लीकर, डॉ. जठर, रचना फुलझले, अंगणवाडी पर्यवेक्षिका एफ. यू. मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सुपारे व डॉ. मने उपस्थित होत्या. कार्यक्रमात तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, गावपातळीवर अपुरा औषधसाठा असणे, उपकेंद्रात पाण्याच्या सुविधा नसणे, प्रस्तुतिगृहाची सोय नाही, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ न मिळणे, काही अंगणवाडी इमारती निर्लेखित केल्या आहेत. पण अजूनही नवीन इमारत झाली नाही. मुलांना बसायला जागा नाही. काही ठिकाणी फरशी खराब झालेली आहे, मुलांना बसता येत नाही. काही अंगणवाडीत किचन शेड नाही. काही अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, लाइटची सोय नाही, काही अंगणवाड्या पावसाळ्यात गळतात. या विषयावर जनसंवाद कार्यक्रमात मुद्दे मांडण्यात आले. याप्रसंगी काही ग्रामस्थांनी गावात असलेल्या आरोग्यविषयक अडचणी मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी व आय. सी. डी. एस. अधिकारी जिल्हा स्तरावरून औषधसाठा नियमित उपलब्ध करून देण्याची उपकेंद्राची समस्या व अंगणवाडीचे मुद्दे सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य पातळीवर मुद्दे मांडून ते सोडविण्याचे आश्वासन जिल्हा समन्वय डॉ. शुभदा देशमुख यांनी दिले. यावेळी तालुका समन्वय सोमेश्वर मेश्राम, तालुका समन्वय संदीप लाडे, तालुका समन्वय माया कोचे, कुरखेडा आरोग्य सेविका, आशा वर्कर, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा गट प्रवर्तक, आरोग्य सहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here