आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम…!

0
259

 

लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६

शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तसेच शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेले बोधेगाव येथील नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे आबासाहेब काकडे औषधनिर्माणशास्त्र पदविका महविद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या उन्हाळी परीक्षा 2023 मध्ये द्वितीय वर्षाचे विद्यार्थी वर्षा कुऱ्हे 75.09 प्रथम, कपिल शिंदे 74.64 द्वितीय, तर गायत्री घाडगे हीने 73.55 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला असून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्या घनवट 71.20 प्रथम, साक्षी रानमारे 70.30 द्वितीय तर तनुजा पवार हिने 69.10 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाकरिता आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ़ फार्मसी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय प्राचार्य राजेश मोकाटे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.सोमनाथ वडघने,प्रा.आसीफ शेख,प्रा.जयश्री कोकाट,प्रा.देवीदास खराद, प्रा.कांचन वनवे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव ॲड.डॉ.विद्याधर काकडे ,जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ, महाविद्यालाचे समन्वयक प्रा.संपतराव दसपुते यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आम्हाला या कॉलेजने खूप काही दिलं त्यामध्ये आम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण या दोन वर्षांमध्ये मिळालं तसेच या महाविद्यालयामुळे व कर्तव्यदक्ष प्राचार्य राजेश मोकाटे सर‌ यांच्या पुढाकाराने या दोन वर्षांत तीन इंडस्ट्रीज व्हिजिट झाल्या व नऊ क्षेत्रभेटी ही झाल्या. व महाविद्यालयाच्या अनुभवी स्टाफमुळे आमचा खुप शैक्षणिक फायदा झाला. आमच्या या यशाचे संपूर्ण श्रेय महाविद्यालयास जाते.
(अजय करडे – द्वितीय वर्ष उत्तीर्ण झालेला विद्यार्थी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here