https://youtu.be/3icTfy4k1dA?si=F5ieyHRlLFCJ7j_V
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २६ जानेवारी:- पुन्हा एकदा मिसेस इंडिया मनीषा मडावी यांनी आपली आदिवासी संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने. आदिवासी विवाह पद्धतीवर कमका सोकाट हे अल्बम सॉंग लोकांसमोर घेऊन आले आहेत. कमका सोकाट हा अल्बम सॉंग आदिवासी पद्धतीतील मंडप पूजन पासून तर हळद व इतर विवाह पद्धतीपर्यंत चे समारंभ यामध्ये दाखविण्यात आले आहे. या अल्बम सॉंग ची शूटिंग धानोरा तालुक्यातील महावाडा नंबर २ या गावांमध्ये करण्यात आली होती. या गीताचे गायन आदिवासी सिंगर निलेश तोडसाम करंजी( यवतमाळ) व स्वतः मनीषा मडावी यांनी केले आहे . कमका सोकाट हे अल्बम सॉंग बनवण्याचा उद्देश विलुप्त होत चाललेली आदिवासी संस्कृती आदिवासी संस्कृतीतील विवाह संस्कार याची पुनर आठवण करून देणे आहे असे मनीषा मडावींनी सांगितले आहे. या अल्बम सॉंग मध्ये कलाकार म्हणून जगदीश मडावी व मनीषा मडावी यांच्यासोबतच झाडीपट्टीचे दिग्गज कलाकार सुनील चटगुलवार, भास्कर मेश्राम, अन्नपूर्णा मेश्राम, लक्ष्मी कन्नाके, अंजली गोडापे, मृणाल मसराम, गोपाल उईके, गीता उईक, प्रवीण मडावी, अशा अनेक कलाकारांनी सहभाग घेतला असून. डायरेक्शन स्वतः मनीषा मडावी यांनी दिला आहे. मेकअप आर्टिस्ट शितल मेश्राम यांनी वेशभूषा तर पूजा स्टुडिओ चे संचालक दीपक दुधे आणि पियुष चंद्रगिरी यांनी हे सॉंग कॅमेरा बद्ध केले आहे
या अल्बम सॉंग ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे सॉंग यूटूब ,इंस्टाग्राम वर तुफान वायरल होत आहे.