गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य
“गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन 2024” चे आयोजन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 30 जानेवारी:- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त, अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणेकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन विविध शासकिय योजना मिळवुन देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे उद्देशाने दिनांक 01/02/2024 ते 03/02/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत भव्य “गडचिरोली महोत्सव” व दि. 04/02/2024 रोजी “महामॅरेथॉन 2024” चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेल्या भव्य गडचिरोली महोत्सव तीन दिवस चालणार असुन, या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा, विर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असुन दुर्गम व अतिदुर्गम भागातुन आलेल्या संघामध्ये हया स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट तसेच विविध संस्थां आपले उत्पादनाचे व वस्तुंचे स्टॉल लावणार आहेत. यासोबतच हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकारीता उपलब्ध असणार आहेत. तसेच दि. 02 व 03 फेब्रुवारी सायं 07 ते 10 वाजता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे प्रसिध्द कलाकार सहभागी होणार आहेत.
गौरव मोरे (महाराष्ट्र हास्य जत्रा फेम), शिवाली परब (महाराष्ट्र हास्य जत्रा फेम), रवीन्द्र खोमणे (संगीत सम्राट विजेता), संज्योती जगदाळे (सुर नवा, ध्यास उपविजेती), प्रथमेश माने (महाराष्ट्र बेस्ट डान्सर विजेता), अपेक्षा लोंढे (महाराष्ट्र बेस्ट डान्सर उपविजेता), आर.जे आरव (रेडीओ ऑरेंज), व आर.जे. भावना (माय एफ.एम) हे आपली कला सादर करणार आहेत, तसेच गडचिरोली जिल्हयातील स्थानिक कलाकरांनी सहभाग घेतला आहे,
तसेच महामॅरेथॉन 2024 या स्पर्धेत जिल्हयातील 13000 हुन अधिक स्पर्धक सहभाग होणार आहे. सदर स्पर्धेत वेगवेगळया वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असुन त्यामध्ये 21 किमी, 10 किमी, 05 किमी, 03 किमी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सहभागी होण्याया धावपटुंना टी-शर्ट, मेडल, हुडी बॅग, प्रमाणपत्र, झुंबा सेशन, अल्पोपहार व विजेत्यांसाठी पारितोषीके देण्यात येणार आहे. तरी या सर्व खेळाडु व कलाकारांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता सर्व नागरीकांनी या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आव्हान मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी केले आहे.