मार्चअखेर शासकीय बँक व कोषागाराचे कामकाज उशीरापर्यंत सुरू ठेवा जिल्हाधिकारी यांचे आदेश

0
48

मार्चअखेर शासकीय बँक व कोषागाराचे कामकाज उशीरापर्यंत सुरू ठेवा जिल्हाधिकारी यांचे आदेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.19: जिल्ह्यातील कोषागारे, उपकोषागारे, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादीच्या सर्व शाखा 31 मार्च 2024 रोजी रविवारला पुर्ण वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत किंवा आवश्यकता भासल्यास त्यानंतरही सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गडचिरोली संजय दैने यांनी दिले आहे.
दिनांक 31 मार्च हा वित्तीय वर्ष 2023-24 या कार्यालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. या वित्तीय वर्षातील सर्व हिशोब त्याच दिवशी पूर्ण करणे अनिवार्य आहे. वित्तीय वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कोषागार व बँक इत्यादींचे आर्थिक व्यवहार सायंकाळी 4.30 वाजेपर्यंतच सुरु असतात. मात्र वित्तीय वर्ष संपुष्टात येण्यापूर्वी अपवादात्मक परिस्थतीत ऐनवेळी शासनाकडून प्राप्त होणारे आकस्मिक खर्चाचे अनुदान 2023-24 या वित्तीय वर्षात खर्च करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी महाराष्ट्र कोषागार नियमानुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन वरील आदेश निर्गमित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here