सावली : देवस्थान मार्गावर दारूचे दुकान ? नागरिक संतप्त

0
401

– महिलांचा तीव्र विरोध,

लोकवृत्त न्यूज
सावली : तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूचे दुकान थाटण्याचा प्रकार दिसत असून सध्याच्या घडीला सावली तालुका हा गडचिरोली जील्ह्यालगत असल्याने अनेक दारूचे दुकाने ही दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या भरवश्यावर सुरू होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाचा आता सावली तालुक्यातील प्रसिद्ध ‘क’ पर्यटन दर्जाचे धार्मिक तीर्थस्थान श्री क्षेत्र मुरखंडेश्वर देवस्थान कडे जाणाऱ्या मुख्य चौकातच नवीन देशी दारूचे दुकान होणार असल्याच्या चर्चेला बिंग फुटल्याने आता येथील स्थानिक नागरिक संतप्त होत तीव्र विरोध करताना दिसत आहेत. याप्रकरणात महिलांनी पुढाकार घेत तीव्र विरोध केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यालगतच्या परिसरात मोठ्याप्रमाणात दारूचे दुकान सुरू करण्यात आले. अशातच दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यालगत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका आल्याने या तालुक्यातील दारूच्या दुकानात वाढ झाली आहे. त्यातच आता देवटोक येथील देवस्थानाकडे जाणाऱ्या परिसरातील रस्त्यावर ज्या ठिकाणी एकही लोकवस्ती नाही अशा ठिकाणी जाम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सीमेच्या काठावर नवीन दारु दुकान सुरू होण्याचा प्रस्ताव तालुक्यातील एका नेत्याच्या माध्यमातून झाल्याची चर्चा सुरू आहे. सदर नेता हाच स्वतः जोर लाऊन त्या ग्रामपंचायत अंतर्गत काही जणांचा विरोध असतांनाही आर्थिक बळावर ठराव पारित केल्याची चर्चा त्यावेळी होती. मात्र त्यावेळेस पासून आतापर्यंत सदर वेळेपर्यंत या दारु दुकानाचा प्रस्ताव थंड बसत्यात होता मात्र पुन्हा नव्याने सुरु होणार असल्याची चर्चा सद्या परिसरात आहे. मात्र याला परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून प्रसिद्ध देवटोक मंदिराचा परिसर दारु चा चौक म्हणून प्रसिद्ध करणार का? दारूच्या दुकाने काय साध्य करणार ? असा प्रश्न उद्भवत असून याला महिलांनी तीव्र विरोध दर्शवित या प्रकारांची दखल घेऊन हे दुकान थाटने थांबविण्यात यावी यासाठी विरोधीपक्षनेते तथा या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी यांना निवेदन परिसरातील नागरिक देण्यार असल्याची माहिती असून या ठिकाणी दारूचे दुकान झाल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊन नागरिकांमध्ये प्रचंड द्वेश निर्माण होऊन नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here