– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साधणार संवाद
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१७ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी बहिणींचा उद्या 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी ३ वाजता गडचिरोली येथील अभिनव लॉन मध्ये भव्य मेळावा होणार असून त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. तर यावेळी प्रमुख आमदार परीनय फुके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यातील सर्व महिला भगिनी सर्व महिला सरपंच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. जे लाभार्थी वंचित राहिले त्यांचे फॉर्म भरून दिल्या जाणार आहेत तसेच ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचाही पाठपुरावा घेण्यात येणार आहे.
थेट संवाद साधताना अनेक लाभार्थी लाडकी बहीण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, तसेच भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, प्रदेश महिला आघाडी सदस्य रेखाताई डोळस, युवामोर्चा युवती प्रमुख पायल कोडापे यांनी दिली आहे.