गडचिरोली शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा

0
88

विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने उत्सव

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :-  दहीहंडी उत्सवाचे महत्त्व दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील आठवणींना उजाळा देणारा सण आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, खोडकर बालकृष्णाला दही. दूध आणि लोणी (माखन) खूप आवडायचे. त्या काळी गोकुळात दूध, दही, लोणी साठवून ठेवले जात होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारच्या घरांतून दही आणि लोणी चोरण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यावेळी गोकुळातील महिलांनी भगवान कृष्णांच्या मित्र-सवंगड्यांच्या हाती दही-लोणी लागू नये म्हणून दही आणि लोण्याची मडकी छताला टांगायला सुरुवात केली. यावेळी कृष्ण मित्र-सवंगड्यांसह पिरॅमिड बनवून मडकी फोडायचे आणि दही खाण्याचा आनंद घ्यायचे.

शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सव विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेत्येक कुटुंबातील नागरिक निवासस्थानी जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्याच प्रमाणे सार्वजनिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा करून हिंदू संस्कृती जपावी असे आव्हान आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले

यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रामायण खटी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भ्रूगवार, दीपक भारसागडे, प्रकाश अर्जुनकर, चव्हाण, सलामे, राहुल भांडेकर, तसेच विश्व् हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी मंडळाचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here