तिघांवर गुन्हा दाखल देशी व विदेशी दारु जप्त

0
318

तिघांवर गुन्हा दाखल देशी व विदेशी दारु जप्त

लोकवृत्त न्यूज
अहेरी दि.3 :- गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व अहेरी पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणा­या धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील आरोपी
1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे,
2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे,
3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे,
सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अहेरी पोलीस पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here