३ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

0
87

समाजाचे ऋण फेडण्याचे प्रयत्न – आमदार डॉ.होळी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- अत्यंत विपरीत परिस्थितीतून आपण वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर आमदार या पदापर्यंत पोहोचलो. त्यात माझ्या गावाचे, माझ्या समाजाचे माझ्यावर असलेले प्रेम, स्नेह व ऋण आहे. ते प्रेम व ऋण माझ्या सदैव स्मरणात राहील. आपण गावाच्या व या परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला असून आपल्या विकास कामातून आपल्या गावाचे व आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचे प्रयत्न आपण करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी रायपूर येथे आयोजित गिलगाव जमीनदारी व गडचिरोली तालुका परिसरातील आदिवासी मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर प. स. चे माजी सभापती मारोतराव इचोडकर, गिलगाव जमीदारीचे हरिश्चन्द्र अलाम, ज्येष्ठ आदिवासी नेते दशरथ पुंगाटी, रायपूर ग्रामसभा अध्यक्ष सुभाष वळधा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व प्रचारक शक्ती केराम, सरपंचा मंगला करगांमी, डोमाजी तुमरेटी, वासुदेव कळ्यामी,दिलीप चलाख, मधुकर नरोटे, नामदेव पोटावी, गणपत किरंगे, प्रतिभा कोल्हेवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रायपूर येथे ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायपूरच्या स्वागत गेटपासून कार्यक्रम स्थळापर्यंत आमदार डॉ. देवराव होळी यांचे गोंडी नृत्यसह त्यामध्ये स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला गडचिरोली तालुका व गिलगाव जन्मदारी परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here