मेळाव्याला लाडक्या बहिणीचा प्रचंड प्रतिसाद
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.३०:- राज्यातील महायुतीच्या सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता अनेक पावले उचलले असून विवीध योजनांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देत नवं उद्योजक व लखपती दीदी बनविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने केलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे डॉ. देवराव होळी यांनी चित्तरंजनपुर येथील लाडक्या बहिणीच्या मेळाव्या प्रसंगी केले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, बंगाली समाजाचे नेतृत्व दिपक हलदार, प स माजी उपसभापती वंदना गौरकार, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, माजी जि. पं. सदस्या शिल्पा रॉय, मनमोहन बंडावार, विनोद गौरकार, महिला मोर्चाच्या तालुक्याचे अध्यक्ष अनिता रॉय, सह मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्र आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वतीने चित्तरंजनपुर तालुका चामोर्शी येथे लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना आमदार महोदय म्हणाले की राज्यातील महायुतीच्या सरकारने आपल्या लाडक्या बहिणीसाठी १५०० रुपयाचे मानधन सुरू केले. हे मानधन महाविकास आघाडीचे नेते बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य धडा शिकवावा व महायुतीला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.