गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांकडे अतुल गण्यारपवार यांनी राज्यपालांचे वेधले लक्ष

0
110

गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांकडे अतुल गण्यारपवार यांनी राज्यपालांचे वेधले लक्ष

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०४ : महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे नुकतेच २ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली शहराध्यक्ष विजय गोरडवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले यांनी सर्किट हाऊस गडचिरोली येथे भेट घेऊन जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या आणि अतिशय निकडीच्या समस्यांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.
गोसीखुर्द धरणातून वारंवार पाणी सोडल्याने कृत्रिम पूर येत असते. त्यामुळे सततच्या कृत्रिम पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे वारंवार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे सततच्या कृत्रिम पुरामुळे सतत आर्थिक नुकसान होत असते. अशा शेतकऱ्यांना नियमित आणि दरवर्षी विशिष्ट मोबदला ठरवून दरवर्षी देण्यात यावा.
सन २०११ मध्ये या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या कार्यकाळात सुमारे ४० ते ४२ हजार वन जमिनीचे पट्टे या जिल्ह्यातील अतिक्रमित शेतकऱ्यांना एक विशेष अधिकारी (उप जिल्हाधिकारी) नियुक्त करून त्यांचे माध्यमातून देण्याचा काम करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही आणखी बरेच शेतकरी वनजमिनीच्या पट्ट्यांपासून वंचित आहेत .अशा शेतकऱ्यांना त्याच धर्तीवर एक विशेष अधिकारी (उपजिल्हाधिकारी )नियुक्त करून प्रलंबित सर्व अतिक्रमित शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे देण्याबाबत मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील प्रशासनात फार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नागरिकांचे काम वेळेत होत नसल्यामुळे नागरिक उदासीन आहेत. अशा विविध मुद्द्यांवर अतुल गण्यारपवार यांनी राज्यपाल यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून लक्षात आणून दिले. त्यानंतर महामहीम राज्यपाल यांनी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना मुद्द्यांची नोंद करून त्वरित सोडवण्या करीता प्रक्रिया पार पाडण्याबाबत आदेश दिले. तसेच वेळे अभावी उर्वरित जिल्ह्यातील समस्यांबाबत पुढील दौऱ्याचे वेळी किंवा मुंबई येथे चर्चा करण्याचे महामहीम राज्यपाल यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here