– स्फोटक केले नष्ट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१६ : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर स्फोटके (I.E.D)पेरून ठेवले होते मात्र गडचिरोली पोलिसांना याची माहिती मिळताच ते नष्ट करून नक्षल्यांचा कट उधळून लावला आहे.
भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील स्फोटके पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले. शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.
सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे