पुसद बस स्थानक आगारप्रमुख एसीबीच्या जाळ्यात

0
144

पुसद बस स्थानक आगारप्रमुख एसीबीच्या जाळ्यात

लोकवृत्त न्यूज
पुसद:- रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्यारीता आगारप्रमुखाने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगेश निळकंठराव पांडे (वय ४८ ) पद आगार व्यवस्थापक, (वर्ग २) पुसद आगार ता. पुसद जि. यवतमाळ असे लाचखोर आगारप्रमुखचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी २ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे मंगेश पांडे यांनी त्यांचे रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्यारीता ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
तपास केला असता पांडे यांनी सापळा कार्यवाही दरम्यान आगार व्यवस्थापक कार्यालयातील त्यांचे कॅबीन मध्ये ५००० रूपये लाचरक्कम तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली असता पांडे यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, पोहवा जयंत ब्राम्हणकर, पोना सचीन भोयर, सुधीर कांबळे, इफ्फाज काझी व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here