तेली समजला जागृत करण्यासाठी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व मेळाव्याची आवश्यकता

0
37

– प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : तेली समजला जागृत करण्यासाठी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व मेळाव्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीचे प्रमोद पिपरे यांनी १५ डिसेंबर रोजी गडचिरोली येथील श्री. संताजी स्मृती प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीचा कार्यक्रमात ते बोलत होते.
१५ डिसेंबर रोजी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीचा कार्यक्रम व श्री. संताजी जगनाडे महाराजांची पालखी मिरवणूक गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आली. दरम्यान यावेळी श्री. संत शिरोमणी संताजी जगणाडे जयंती तथा नवनिर्वाचित मान्यवराचा सत्कार श्री. संताजी स्मृती प्रतिष्ठान कार्यालय, पटवारी भवना मागे, सर्वोदय वार्ड, आरमोरी रोड गडचिरोली येथे पार पडला. यावेळी गडचिरोली विधानसभा आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी. आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी व अध्यक्ष – महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधीकरन, मुंबई मा. न्या.प्रमोद तरारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीचे प्रमोद पिपरे हे मार्गदर्शन करतांना म्हटलेकि महाराष्ट्राला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे. संताजी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तुत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पूर्ण जीवन भर समाजाच्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. यातील एक महान संत म्हणजे श्री.संताजी जगनाडे महाराज यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ८ डिसेंबर १६२४ रोजी तेली समाजात जन्म झाला त्यांचे मुळ गाव महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्यातल्या मावळ तालुक्यातील संदुबे या गावी झाले.
आज या ठिकाणी श्री.संत जगणाडे महाराजाची समाधी व स्मारक उभे केले आहे. संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाज कान्ठ्कानी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व गाथा संताजी महाराजांना मुखादेन म्हणजे तोंड पाठ होती म्हणून तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी त्यांनी ते पुन्हा लिहून काढली. संत तुकाराम महाराजांची मुखातून लिहिणारे अभंग आपल्या लेखणीने टिपून होत घेत, संत तुकाराम महाराजाची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत समाज कंठकानी बुडवून दिले, तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामाच्या स्वाधीन केली. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजाच्या विचारांचे महान कार्य श्री.संत संताजी जगनाडे महाराजांनी केली. एवढ्या मोठ्या थोर संताची तेली समाजात आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने व तेली समाजाला जागृत संस्कृत करण्याचे काम गावागावातील तेली समाज संघटनाणी केली पाहिजे असे आवाहन प्रमोद पिपरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, अध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली हे होते. यावेळी प्रामुख्याने सौ. योगिता पिपरे, माजी. नगराध्यक्षा तथा उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महा. प्रा. तैलिक महासभा, सुरेश भांडेकर, अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, देवाजी सोनटक्के, कार्याध्यक्ष महा. प्रा. तेली महासभा गडचिरोली, बाबुराव कोहळे, विदर्भ उपाध्यक्ष महा. प्रा. तेली महासभा, गोपीनाथ चांदेवार, उपाध्यक्ष विदर्भ तेली महासंघ, प्रा. देवानंद कामडी,अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली, ॲड. रामदास कुणघाडकर, उपाध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली, रवींद्र निंबोरकर, अध्यक्ष तेली समाज सर्वोदय वार्ड गडचिरोली, रमेश कांबळे, उपाध्यक्ष तेली समाज सर्वोदय वार्ड गडचिरोली, मनोहर भांडेकर अध्यक्ष तेली सेवा समिती हनुमान वार्ड गड, भगवान ठाकरे अध्यक्ष संत. ज. म. जी. बहू. सं. गड, घनश्यामजी लाकडे कार्याध्यक्ष संताजी ज. म. जी. बहू. सं. गड, भैय्याजी सोमनकर अध्यक्ष संताजी नागरी सह. पत. संस्था गडचिरोली, विष्णुजी कांबळे, प्रफुल आंबोरकर, मुक्तेश्वर काटवे, राहुल भांडेकर सौ. ममता चिलबुले, सौ. शालिनी कांबळे,सौ.भावना निंबोरकार, सौ. पौर्णिमा कायरकर, सौ. अनिता कोलते, सौ. आरती बाळेकरमकार, सौ. वैष्णवी नैताम, सौ. रोशनी राखडे व सर्व तेली समाज युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here