धोबी समाजातर्फे गाडगेबाबांना अभिवादन

0
40

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२०: निष्काम कर्मयोगी संत श्री गाडगेबाबा यांना ६८ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरटी सेवामंडळ जिल्हा गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अभिवादन करण्यात आले.
यावेळी विजय गोरडवार माजी सभापती न प गडचिरोली तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) शहरअध्यक्ष यांच्या हस्ते श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले व गाडगे बाबांचा जयघोष करण्यात आला.तसेच श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाला संतोष आकणुरवार जिल्हाध्यक्ष धोबी समाज संघटना, मोरेश्वर मानपल्लीवार जिल्हा सचिव, प्रवीण ताजने युवक कार्याध्यक्ष, सुभाष रोहनकर, दिवाकर ताजने, दिलीप कोल्हटवार, लता वरघंटे, मंगला केळझरकर, प्रभाकर रोहणकर, पी जी राहुलवार, गजानन कुद्रकवार , महेश कोतकोंडावार, पंकज केळझरकर, अरविंद मादेश्वार, माणिक केळझरकर, राजू कंटीवार,नितेश केळझरकर, प्रकाश राजकोंडावार,नेताजी कावळे,प्रमोद ताडपलीवार, अनिल म्हशाखेत्री, क्रिष्णा रोहनकर,सुनिता गोरडवार,कल्पना चतुरकर, ज्योती येम्पल्लीवार, आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here