लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२० : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप वर ग्राहकांना सर्व निशुल्क सुविधा देण्यात येत नसल्याचा तक्रार ग्राहकांनी केल्याने सर्व सुविधा ग्राहकांना देण्यात यावे या करिता अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली च्या वतीने निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांना देण्यात आले.
ग्राहक सरंक्षण अधिनियम,२०१९ च्या कलम ६ व ८ नुसार ग्राहकांच्या अधिकाराच्या संवर्धन व सरंक्षण करण्यासाठी राज्य स्तरावर राज्य ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक सरंक्षण स्थापन करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा शाखा –गडचिरोली च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यात जिल्ह्यतील सर्व वाहन धारकांना पेट्रोल पंप वर शासन नियमा नुसार पुरुष व महिला करिता स्वतंत्र स्वच्छतागृह,निशुल्क हवा केंद्र,पंप वर झिरो चे आकडे,शुद्ध व थंड पिण्याची पाणी, पितळी वजन मापे ठेवणे या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.तसेच येथे कार्यरत कर्मचारी वर्ग हा मद्यपान व खर्रे करून राहतात. ग्राहकांना पेट्रोल देतांना असे नेहमी निदर्शनात येत असून या बाबत ग्राहक पंचायत कडे शेकडो ग्राहकांच्या तोंडी तक्रारी आलेले आहेत.या बाबत पे ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांनी पेट्रोल पंप वर या बाबत स्वतः अनुभव घेतला असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कडे निवेदनद्वारे यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी. जेणे करून हजारो ग्राहकांना न्याय मिळेल. या बाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी करू असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चर्चा करून संबधित अधिकारी यांना योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली.
यावेळी सह जिल्हा पुरवठा अधिकारी कापडे सह जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे,जिल्हा सचिव उदय धकाते,जिल्हा संघटक विजय कोतपल्लीवार,सदस्य अरुण पोगळे उपस्थित होते.