– अन्यथा पुन्हा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर : ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’ तून अर्थसहाय्य करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, असून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा करण्यात आलेला नाही. ज्या मुला-मुलींना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना आधार योजनेची रक्कमही मिळाली नाही. वसतिगृहात वाचनालयाची सोय करावी अशी मागणी राष्ट्रिय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी सहायक आयुक्त आशा कवाडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शासनाने आता मुलांसाठी १०० टक्के शिष्यवृती लागू केली पाहिजे. राज्यातील उच्च शिक्षण घेणारे इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता म्हणून वर्षांला ६० हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी तातडीने कारवी. तसेच विद्यार्थ्यांना ‘आधार योजनेतील’ आर्थिक मदतीचा एकही हप्ता अद्याप बँक खात्यात जमा करण्यात आला नाही. राज्यात ५२ ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आले असून तेथे भोजनाची व्यवस्था नाही. वसतिगृहात भोजनाची सोय करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यात निर्वाह भत्ता जमा केला जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ना भोजन मिळाले, ना निर्वाह भत्ता वसतिगृह सुरू झाल्या पासून मागील चार महिन्यांपासून निर्वाह भत्ता देण्यात आला नाही आहे तो लवकरात लवकर देण्या यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना अक्षय येरगुडे, आकाश लोडे, मनीषा बोबडे, स्नेहल चौथाळे, प्रशांत पिंपळशेंडे, अनिकेत पिंपळशेंडे, प्रथम पिंपळकर, वैभव क्षीरसागर उपस्थित होते.