– आमदार डॉ मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे निवेदनातून मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चित्तेकनार गावातील नागरिक शासकीय योजनेपासून व लाभापासून वंचित आहेत, गावामध्ये अनेक समस्यांचा डोंगर असल्याने गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती तर्फे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदनातून करण्यात आली.
गावामध्ये आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी फक्त शोभेची वस्तु बनली आहे, नळाला अद्यापही पाणी येत नाही, गावात घरोघरी नळ योजना सुरू करा, घरकुल योजने पासून वंचित असलेल्या गरजू कुटुंबाना घरकूल द्या, गावातील विकासकामावर भर देऊन सी सी रोड व नाली बांधकाम करा, चित्तेकणार ते पूले नदीपर्यंत रोड रुंदीकरण करा, सभामंडपाची तसेच गावामध्ये सामूहिक शौचालयाचे बांधकाम करा, युवा तसेच सुशिक्षित, शिक्षित मुलांना व्यायाम शाळा, अभ्यासिका, क्रीडांगण उपलब्ध करून द्या, जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत नसल्याने ते त्वरीत मंजूर करून बांधकाम करावे, आदिवासी परंपरा प्रमाने कुर्माघराची गरज असून ती पूर्ण करावी, 2006 अतिक्रमण वनपट्टे मिळाले नाहीत अशा लोकांना त्वरीत वनपट्टे मिळवून द्यावे,गावामध्ये वाढीव विद्युत पोल तसेच चौकात लाईट व्यवस्था उपलब्ध करून द्यावे, तलाठी सज्जा क्र. 2 चे तलाठी हे नेहमी गैरहजर असतात तसेच मुख्यालय राहत नाही त्यामुळे नागरिकांचे वेळेवर काम होत नाही, कुथेगाव ग्रा.प. अंतर्गत झालेल्या संपूर्ण नाली बांधकामचे कितेक वर्षा पासून उपसा झालेले नाही आदी समस्या घेऊन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने आमदार डॉ. नरोटे यांचे लक्ष वेधले. या सर्व समस्यांकडे गाभीर्याने लक्ष देऊन सर्व समस्यां तातडीने सोडवाव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे, जिल्हा उपाध्यक्ष सूरज गुंडमवार, जिल्हा सचिव रोशन कवाडकर, शहर प्रमुख कमलेश बोरूले उपस्थित होते.