गडचिरोली चा विकास हाच ध्यास : सौ. गीता हिंगे

0
86

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.गीता हिंगे यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीमध्ये जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यात आली. विकासात्मक बाबीवर अस्पर्शीत राहिलेल्या विषयावर चर्चा झाली. सामाजिक,आर्थिक,महिलांचे सबलीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. गीता हिंगे यांनी आपल्या चर्चेमध्ये आधारविश्व फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमाची व समाज परिवर्तनाच्या प्रयोगाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
आधारविश्व फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना नवीन वर्षाची डायरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांनी आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे यांच्या कार्याचं कौतुक केलं व त्यांच्या कार्याची दखल घेत जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे तिथे प्रशासनाकडून आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी आधार विश्व फाऊंडेशनच्या सदस्या व भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यामध्ये भाजपा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, महिला मोर्चा जिल्हा सचिव भूमिका बरडे, पायल कोडापे,भारती खोब्रागडे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here