राज्यस्तरीय स्पर्धेत “ऋतुमती – मासिक पाळीचा आनंदी प्रवास” नवोपक्रम जिल्ह्यात प्रथम

0
29

– उपक्रमशील शिक्षिका प्रीती प्रल्हाद नवघडे यांच्या प्रयत्नांना यश

लोकवृत्त न्यूज
चामोर्शि :- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै च्या उपक्रमशील शिक्षिका प्रीती प्रल्हाद नवघडे यांच्या ऋतुमती -मासिक पाळीचा आनंदी प्रवास या नवोपक्रमाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला. गडचिरोली जिल्ह्याचे राज्यावर प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या नवोपक्रमाची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या कुणघाडा रै ही एक उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. नवोदय आणि शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेतील सातत्याने मिळणाऱ्या यशामुळे जिल्हाभर कन्या शाळा स्पर्धा परीक्षेचा केंद्रबिंदू बनली आहे. नवनवीन उपक्रम, प्रयोग,संकल्पना राबवून आनंददायी पद्धतीने शिक्षण दिल्या जाते. याच उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे शाळेतर्फे दरमहा किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन सत्राचे आयोजन करणे. या मार्गदर्शन सत्रामध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तर सोप्या, सहज भाषेत उलगडून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तज्ञ मार्गदर्शक, यूट्यूब मधील व्हिडिओ आणि विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येते.
सदर उपक्रमाचा विद्यार्थीनी आणि पालक वर्गावर सकारात्मक बदल दिसून येत आहे. गटशिक्षणाधिकारी यशवंत टेम्भूर्णे सर आणि केंद्रप्रमुख गोमासे सर यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक वर्षा गौरकार, लीलाधर वासेकर, रेखा हटनागर, निमाई मंडल, गौतम गेडाम, रोशन बागडे, दीपाली बोदलकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here