भीसी फसवणुक करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश

0
955

तक्रारदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २१ ऑगस्ट :- झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक वेगवेगळ्या गैरमार्गाचा वापर करुन मोठी रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच पध्दतीने भीसी ह्या प्रकारातून मोठी रक्कम वसूल करून फसवणुक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नामे- १) सोनु जमशेद ठाकुर २ ) इकरार जमशेद ठाकुर ३) करीष्मा सोनू ठाकुर व ४) उगन शरद जंग यांनी आपसात संगनमत करून तक्रारदार व इतरांना फसविण्याच्या हेतुने आपले कडील भीसीत रक्कम जमा केल्यास, रक्कम जमा करणान्यास १.५ टक्के दराने कमिशन मिळेल च दरमहा कमिशन घेतले नाहीतर भीसीच्या मुदतपुतीनंतर मोठ्या रकमेचा परतावा देण्यात येईल. असे प्रलोभन व आश्वासन दिले. आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडुन फिर्यादी व इतरांनी आरोपी नामे- सोनु जमोद ठाकुर यांचेकडे भीसीची रक्कम जमा केली. परंतु मुदत पुतीनंतर फिर्यादी यांना त्यांचे ३०,००,०००/- रुपये व त्यावरील कमीशन परत न करता

आरोपींनी फिर्यादीची फसवणुक केली. सदर घटनेच्या तक्रारीवरून नमुद गुन्हयातील आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ४१३/२०२२ कलम ४०६, ४२०, ३४ भादंवि सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
व्यवहारिक पैसा गुंतवणूक करताना आपल्याला मोठा साठा कामात पडणार अशा आशेने पैसा बचत करत भिशी खेळत असलेले गडचिरोलीतील नामांत लोकांनी याच्यामध्ये पैसा गुंतवला आहे परंतु तो पैसा कुणाच्याच कामात नाही आला परंतु पैसा हा माणसाची नियत बदलवितो पैसा जेवढा चांगला आहे तेवढाच खराब आहे पैशाच्या लालची मुळे आरोपी सोनू जमोत ठाकूर यांनी आपली संपत्ती विकून व भिशीचा पैसा जमा करून फरार झाला आहेत

पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

तरी वरील नमुद गुन्हयातील आरोपीविरुध्द तक्रार असलेल्या लोकांनी उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, गडचिरोली या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here